पुणे शहरातील मेट्रो शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.
पण मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा सकाळी सहा वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला.
बाणेर, आरबीआय चौक, संचीती हॉस्पिटल या ठिकाणी स्वतः जाऊन मेट्रोचा कामाचा आढावा घेतला.तसेच या दौऱ्यामध्ये मेट्रोचे सर्व अधिकारी स्वतः उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी दादांना कामाची आत्ताची काय स्थिती आहे याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून वळविण्यात येणार आहे. वाहतुकीत काय बदल करण्यात आले आहेत.