पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे पीएम मोदी क्वाड समिट (QUAD Summit 2024) मध्ये सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) यांनी मोदींचे विल्मिंग्टन, डेलावेअर येथील निवासस्थानी स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. यानंतर बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जो बिडेन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बिडेन (Jill Biden) यांना खास भेट दिली.
पीएम मोदींनी जो बिडेन यांना चांदीचे हाताने कोरलेले ट्रेनचे मॉडेल भेट दिले आहे. या सिल्व्हर ट्रेन मॉडेलची खास गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्रातील कारागिरांनी तयार केले आहे. या ट्रेनवर चांदीचे संपूर्ण काम हाताने करण्यात आले आहे. ट्रेन बनवण्यासाठी 92.5 टक्के चांदीचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या ट्रेनच्या मॉडेलवर ‘दिल्ली-डेलावेअर’ असं लिहिलेले आहे.
पंतप्रधान मोदींनी जो बिडेन यांच्या पत्नी जिल बिडेन यांनाही खास भेट दिली आहे. मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला जिल यांना पश्मीना शाल भेट दिली आहे. ही शाल जम्मू आणि काश्मीरच्या अतुलनीय सौंदर्याची शान आहे. या शालीसाठी लागणारे मऊ धागा हाताने तयार केले जातात, ज्याला पश्मा म्हणतात. त्यानंतर पारंपारिकपणे हे धागे कापून पश्मीना शाल बनवली जाते.
पश्मिना शाल पारंपारिकपणे जम्मू आणि काश्मीरच्या पेपर बॉक्समध्ये पॅक करून येतात, जी उत्कृष्ट सौंदर्य आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. कागदाचा लगदा, डिंक आणि इतर नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण वापरून हे बॉक्स हाताने बनवले जातात.
पहा पोस्ट:
जो बाइडेन के गृह नगर में उनसे मुलाकात के दौरान प्रधानमंत्री मोदी ने बाइडेन दंपत्ति को खास तोहफे दिए। उन्होने जो बाइडेन को चांदी का ट्रेन इंजन का मॉडल गिफ्ट किया। वहीं जिल बाइडेन को पश्मीना शॉल भेंट गिया।
यहां पढ़ें पूरी खबर – https://t.co/rZ3UtRSxNe#PMNarendraModi #JoeBiden pic.twitter.com/WkgRtBfwjA
— Hindustan (@Live_Hindustan) September 22, 2024