फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? आता एक लाखात तुम्ही फिरू शकता ‘हे’ पाच देश

0
290

 

आपल्यातील अनेक जण फिरायला जाण्याचा नेहमीच प्लॅन करत असतात. मित्र-मैत्रिणींचा ग्रुप किंवा कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर फिरायला जाण्याचं (Trips) ठिकाण ठरलं, तर कोणतं हॉटेल बुक करायचं? तेथे पोहचल्यावर जवळच्या ठिकाणांना कशी भेट द्यायची ? या गोष्टी तर ठरतात, पण मग समोर बजेटचा प्रश्न उभा राहतो. मग अनेकदा खर्च बजेटबाहेर गेला की, अनेक जण प्लॅनदेखील (Trips) रद्द करतात. तर तुम्हीही असं करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एक लाखाच्या बजेटमध्ये तुम्ही कोणते देश फिरू शकता याची यादी सांगणार आहोत.

थायलंड
थायलंड जगातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर फिरता येईल, त्याचबरोबर तेथील स्ट्रीट फूडचाही आनंद घेता येईल. थायलंडला फिरायला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना अंदाजे ७० हजार रुपये खर्च येऊ शकतो.

व्हिएतनाम
परवडणाऱ्या प्रवासाच्या पर्यायांसह इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आदींचे मिश्रण म्हणजे व्हिएतनाम देश. हा देश फिरण्यासाठी जवळपास तुम्हाला ८५ हजार रुपये खर्च येईल.

नेपाळ
समृद्ध सांस्कृतिक वारसा, सुंदर हिमालयीन दृश्य आणि परवडणारे प्रवास पर्यायांसह नेपाळ हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही जर नेपाळला सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अंदाजे ५० हजार रुपये खर्च येऊ शकतो.

 

फिलिपिन्स
फिलिपिन्समध्ये तुम्हाला नयनरम्य सुंदर समुद्रकिनारे पाहता येतील. परवडणाऱ्या प्रवासाच्या पर्यायांसह हे समृद्ध, सांस्कृतिक वारसा जपणारं शहर आहे. जर तुम्ही भारतातून येथे सहलीला जाणार असाल तर तुम्हाला सुमारे ९५ हजार रुपये खर्च येऊ शकतो.

मलेशिया
मलेशिया भारतीय पर्यटकांसाठी एक लोकप्रिय शहर आहे. या झगमगत्या शहरात अनेक समुद्रकिनारे आहेत, सांस्कृतिक वारसा आणि काही परवडणारे प्रवास पर्यायसुद्धा पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही जर मलेशियाला सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अंदाजे ८५ हजार रुपये खर्च येऊ शकतो.