महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला. 12 वीचा निकाल एकूण 93.37% लागला आहे. यंदा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. परंतु, आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
मात्र, आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा यासाठी काही पर्याय सांगणार आहोत. चला तर मंग जाणून घेऊयात..
विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी :
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात.
जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही पुढे B.Sc पदवीधर होऊ शकता. यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसारखे विषय किंवा यापैकी एक विषय निवडून त्यात पदवीधर होऊ शकता. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीतून M.Sc देखील करू शकता.
बारावीनंतर कला शाखेतील करिअरच्या संधी :
B.F.A (बॅचलर ऑफ फाईन आर्टस् )
B.J.M. (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )
B.SW (बॅचलर ऑफ सोशल वर्क )
B.A (बॅचलर ऑफ आर्ट्स )
B.El.Ed (बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )
इंटिग्रेटेड लॉ कोर्स : लॉ अर्थात कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा एकूण कालावधी हा पाच वर्षांचा असतो. यात विविध कायदा प्रकारच्या कायद्याच्या क्षेत्रांचा समावेश असतो. उदाहरणार्थ वनविषयक कायदे, आयपीसी [IPC], ग्राहक संरक्षण कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी.
B. P. ED (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन )
B.E.M (बॅचलर ऑफ इवेंट मॅनेजमेंट )
B.B.A. (बॅचलर ऑफ बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन ) : फक्त वाणिज्य शाखेतीलच नव्हे तर कला शाखेचे विद्यार्थी सुध्दा या क्षेत्रात करिअर घडवू शकतात.
B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)
फॅशन डिझायनिंग
होम सायन्स
इंटिरियर डिजाइनिंग
ग्राफिक डिझाईन
ट्युरिझम कोर्स
बारावीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी :
कॉर्पोरेट जगात काम करू इच्छिणारे विद्यार्थी सहसा त्यांच्या शिक्षणातील वाणिज्य क्षेत्राची निवड करतात आणि कॅट (CAT) , एक्सएट (XAT) आणि एमएटी (MAT) या परीक्षा देणे आवश्यक आहे. भारत आणि परदेशातील अनेक महाविद्यालये वाणिज्य क्षेत्रातील कोर्स उपलब्ध करुन देत आहेत. बारावी वाणिज्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रम, युजी अभ्यासक्रम (अंडर ग्रॅज्युएशन /Under Graduation) आणि पीजी अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन / Post Graduation) करण्याची शक्यता आहे.
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S)
बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S)
बॅचलर मास्टर ऑफ कॉमर्स (M.Com)
व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A)
बीएड (B.ed)
आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स
इंपोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा
एम.सी.ए. (MCA)
एल.एल.बी. (LLB)
यांसारखे करिअर ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. तसेच, तुम्हाला डिफेन्समध्ये जायचे असेल तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्समधील कोणतेही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्ही आधी एनडीएची तयारी करू शकता. तसेच तुम्हाला शिक्षणात किंवा नोकरीत फारसा रस नसेल तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करू शकता. आणि सगळ्यात मह्त्वाचे वरीलपैकी काही नाही जमले तर स्वतःचा वेगळा व्यवसाय देखील करू शकता.