‘पडळकर बंधू’ कडून घाटमाथ्यावर ‘कोटींच्या निधी’ने विधानसभेची पेरणी

0
8

माणदेश एक्सप्रेस न्यूज/आटपाडी : खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी घाटमाथ्यावर विविध विकास कामासाठी आठ कोटी हून अधिक रुपयांचा निधी दिला असून यातून त्यांनी विधानसभेसाठी साखर पेरणी केली आहे.

खानापूर मतदार संघ हा दोन विभागामध्ये विभागला गेला आहे. यामध्ये घाटावरील घाटमाथा व घाटाच्या खाली असे दोन विभाग असे विभाजन आहे. याच घाटमाथ्यावरील विविध गावामध्ये विकास कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदच्या माध्यमातून तर ब्रम्हानंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या घाटमाथ्यावर विकास कामासाठी मोठा निधी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये घटमाथ्यावरील 22 गावांच्या विकासासाठी तब्बल पाच कोटी अधिक निधी पडळकर बंधू दिला आहे. तर ऐतिहासिक अशा बानूरगडच्या संवर्धनासाठी तीन कोटी निधी रुपयांचा निधी देत गडाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम केले आहे.

बानूरगड अर्थात भूपालगड गेल्या अनेक वर्षपासून दुर्लक्षित होता. त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी पूर्वी असणारे गडाचे बांधकामा बाबत विशेष आर्किटेक्ट नियुक्त करून त्याचे डिझाइन बनवून घेतले आहे. सध्या गडावर सुरू असलेली विकास कामे ही राज्य शासनाच्या पर्यटन विकास निधीतून सुरू असून त्यासाठी आमदार पडळकर यांनी सुरवातीला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तर सध्या दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

तर समाज कल्याण विभागाचे सभापती असताना अनुसूचित जाती, जमाती, बौद्ध, यांच्यासह मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका ब्रह्मनंद पडळकर यांनी घेतली होती. यासाठी प्रसंगी राज्य शासनाशी भांडून निधी आणण्यात त्यांना यश मिळविले होते. जिल्हा परिषदेतील सभापती पद हे फक्त मिरवण्याची न वापरता ज्या घटाकाला खरा न्याय हवा अशा घटकांना न्याय देण्याची भूमिका ब्रम्हानंद पडळकर यांनी राबवली यामुळे त्यांना बाहूबली सभापती हे बिरुदावली जनतेने दिले असून याच बिरुदावलीने ते आगामी विधानसभेसाठी प्रबळ दावेवर आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here