अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात ओरीला वडापावमध्ये मिळाला केस; पहा व्हिडीओ

0
55

ओरी खरंतर काय करतो, हे कोणालाच नीट माहित नाही. पण प्रत्येक स्टारकिडसोबत त्याची खूप चांगली मैत्री आहे, हे त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंट पाहताचक्षणी लक्षात येतं. अंबानींपासून ते बॉलिवूडमधल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सेलिब्रिटीसोबत फोटोमध्ये ओरी झळकतो.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग कार्यक्रम अद्याप संपले नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नापूर्वीचे विविध कार्यक्रम पार पडतायत. जून महिन्याच्या सुरुवातीला अंबानी कुटुंबीयांनी इटलीतील पोर्तोफिनोमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. आता अंबानींची पार्टी आणि त्याला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार नाही, असं कसं होईल? इटलीतील या पार्टीला शाहरुख खान, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, शनाया कपूर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यात सेलिब्रिटी इन्फ्लुएन्स ओरहान अवत्रमणी ऊर्फ ओरीसुद्धा होता. अंबानींच्या कार्यक्रमातील विविध व्लॉग्स त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोर्तोफिनोमधील व्हिडीओमध्ये ओरीने विविध फूड स्टॉल्स दाखवले. पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याची किती रेलचेल होती, ते त्याने व्हिडीओमध्ये दाखवलं. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. ते म्हणजे अंबानींच्या कार्यक्रमात ओरीला एका वडापावमध्ये केस आढळला होता.

ओरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहुणे एका स्टॉलवरून दुसऱ्या स्टॉलवर जात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. विविध प्रकारचे पास्ता, चीजचे अनोखे प्रकार, विविध सॉसेसमधील बॉम्बोलोन्स.. असे अनेक पदार्थ या फूड स्टॉल्सवर पहायला मिळत आहेत. ओरी आणि त्याची मैत्रीण तानिया श्रॉफ हे एका वडापावच्या स्टॉलवर येऊन थांबतात. ‘पोर्तोफिनोमधील सर्वोत्कृष्ट वडापाव’ असं म्हणत तानिया आणि ओरी हे वडापाव चाखतात. वडापावचा एक घास खाल्ल्यानंतर तानिया म्हणते की “त्यात केस दिसतंय.” त्यानंतर ओरीसुद्धा वडापावचा एक घास खातो. त्यावेळी तानिया म्हणते, “मला अजून एक घास खायचा होता पण त्यात केस आहे.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

 

अंबानींनी जामनगरमध्येही तीन दिवसांचा प्री-वेडिंग कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार यांसह इतरही अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तर आंतराराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहाना, पंजाबी गायक दिलजित दोसांझ, अकॉन यांनी परफॉर्म केलं होतं. त्यानंतर तीन दिवस क्रूझवरील पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्रान्स, इटली या देशात ही क्रूझ फिरून आली होती. या क्रूझवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळी बॅकस्ट्रीट बॉइज, केटी पेरी यांसारख्या आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या गायकांनी परफॉर्म केलं होतं. तर काही दिवसांपूर्वी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी जस्टीन बिबर भारतात आला होता.

पहा व्हिडीओ: