जत तालुक्याच्या विकासाची गाडी गोपीचंद पडळकरच गतिमान करू शकतात : सलीम गवंडी

0
38

माणदेश एक्सप्रेस न्युज : जत/प्रतिनिधी : राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुका स्वतंत्र्यानंतरही विकासापासून कोसो दूर राहिला असल्याने, जत तालुक्याच्या विकासाची गाडी आमदार गोपीचंद पडळकरच गतिमान करू शकतात असा विश्वास सलिम गवंडी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आजही जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून, विस्तारानेही सांगली जिल्ह्यात जत तालुका खूप मोठा आहे. याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सीमावर्ती भागातील विविध प्रश्न जैसे तेच राहिले आहेत. या भागाला अद्याप, शेतीचे पाणी पोहचले नाही. आतापर्यंतच्या नेतेमंडळीनी फक्त मतापूरताच या भागातील जनतेचा उपयोग करून घेतला आहे. यासाठीच जत विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनता आता, ‘एकच छंद जतचा आमदार गोपीचंद’ अशी म्हणू लागली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे जत विधानसभा मतदारसंघातील जनता उभी राहिली आहे. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण मतदार संघात कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण केली होती. लोकसभेला सांगली जिल्ह्यामध्ये फक्त जत विधानसभा मतदार संघातूनच मताधिक्य मिळाले होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. याचं बरोबर गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुन्हा सात कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीला, नवीन इमारतसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

जत मतदार संघातील बांधकाम कामगार, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम आहे. दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारे नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिले जाते. तालुक्यातील वंचीत, दलित, भटक्या विमुक्त जाती जमाती व बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका नेहमीच गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी जत विधानसभेमधून आमदार गोपीचंद पडळकर हे मोठ्या मताधिक्याने, आमदार म्हणून निवडून येणारअसल्याचे सलीम गवंडी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here