आटपाडीत फलटण येथील एकाचा मृत्यू

0
1375

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील शेटफळे रोड जवळ फलटण येथील एकजण मृत्यावस्थेत आढळून आला. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी येथील शेटफळे रोडला खवणीच्या जवळ काल सायंकाळी ०७ च्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या लोकांना एकजण मयत झाल्याचे दिसून आले. यावेळी तेथील लोकांनी आटपाडी पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली.

 

 

पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत मयताची पाहणी केली. यावेळी त्याच्या जवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली असता, त्यामध्ये असणाऱ्या कागदपत्रावरून सदर व्यक्तीचे नाव हे दत्तात्रय वामन गेजगे, वय 65 वर्षे, रा. साठेफाटा ता. फलटण, जि. सातारा असल्याचे समजले.

 

 

तसेच सदर दत्तात्रय गेजगे ही व्यक्ती आटपाडी मुढेवाडी येथील असलेले किसन पोपट ऐवळे यांचे नातेवाईक असल्याचे माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here