तासगावात फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाचा खून तर एक गंभीर

0
1186

माणदेश एक्सप्रेस न्युज : तासगाव : तासगाव तालुक्यातील येळावी येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून कोयता व धारधार शस्त्राने हल्ल्या करण्यात आला. यामध्ये एक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. दीपक जयसिंग सुवासे (वय २७) असे खून झालेल्याचे तर आकाश दीपक सुवासे हे गंभीर जखमी आहेत.

 

या प्रकरणी मयुरी दीपक सुवासे (वय २३ रा, येळावी ) यांनी सूरज उर्फ विश्वजित सावकार मोहिते, इंद्रजित उर्फ लाल्या सावकार मोहिते व सुगंधा सावकार मोहिते सर्व रा. येळावी या आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित इंद्रजीत हा दिवाळी निमित्त रात्री नऊ वाजता फिर्यादी मयुरी यांच्या दारात फटाके फोडत होता. यावेळी फिर्यादी यांनी फटाके फोडू नका माझ्या मुलाला धुराचा त्रास होतोय तो आजारी आहे अशी विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्ष करून इंद्रजीत याने मी फटाके फोडणारच असे उलट बोलून त्यांना शिवीगाळ केली.

संशयित इंद्रजित, सूरज व सुगंधा हे सर्वजण हातात कोयता, धारधार शस्त्र व काठी घेऊन फिर्यादी मयुरी याच्या अंगणात आले.व त्यांनी दीपक व आकाश याच्यावर हल्ला केला. यात दीपक व आकाश हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असताना दीपक याचा मृत्यू झाला. हे दोन्ही कुटूंब शेजारी शेजारी राहत असल्याने या कुटूंबात जुना वाद आहे. हे ही कारण या मागे असून त्यातूनच हल्ला झाला असल्याची घटना स्थळी चर्चा सुरू होती.