आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा सविस्तर

0
8295

माणदेश एक्सप्रेस : आज 03 नोव्हेंबर. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीजेचा दिवस. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला जर नोकरीत बदल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राच्या सल्ल्याने घेऊ शकता. तसेच, तुमच्या आयुष्यात जर एखादी समस्या असेल तर ती लवकरच दूर होतील. जर तुमचे पैसे रखडले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे.

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं असेल. पण, व्यवहारात मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळतील. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या साहाय्याने तुमची कामे पूर्ण होतील. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. आज तुम्ही नवीन वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी चढ-उतार असतील तर ते लवकर दूर होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच, तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल.

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही ध्यान, योगा करणं आवश्यक आहे. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तसेच, तुम्ही जुनी गोष्ट आठवून सतर्क व्हाल.

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात संयम राखणं गरेजचं आहे. तसेच, वैवाहिक नात्यात गोडवा पाहायला मिळेल. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. तसेच, कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका. अन्यथा, तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल.

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करत असाल तर ती गोष्ट आज तुमच्याकडून पूर्ण होईल. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही तडजोड करु नये. तसेच, व्यवसायाचे नवनवीन पर्याय तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल.

तूळ
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत कामाचा ताण असेल, परंतु जास्त लोड घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाचा दिवस चांगला असेल. सणांचे दिवस येत असल्याने नफा होईल. तुमच्या परीक्षा सुरू असतील तर जोमाने अभ्यास करा, तरच अपेक्षित यश मिळेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.

वृश्चिक
नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचा आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. बाकी लोकांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापारी वर्ग वस्तूंवर चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढेल, ज्यामुळे नफाही वाढेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्यावर अभ्यासाचं ओझं असेल. काही कामासाठी पालकांकडून पैसे घेण्याची गरज पडेल. आजार किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.

धनु
नोकरदार लोकांना आज लाभ होईल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील, ते तुमच्यावर खूश होऊन काही चांगला निर्णय घेऊ शकतात. रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांचा हा काळ चांगला असेल. तुम्ही जी कोणती डील कराल त्यात चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही आज अभ्यासात जास्त लक्ष द्यावं, अन्यथा परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांचा ओरडा मिळेल. आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा डोकेदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

मकर रास
आजचा दिवस तुमचाच आहे. कामात आज तुम्हाला चांगला लाभ होईल, सहकाऱ्यांचं सहकार्यही लाभेल. आज व्यवसायासाठी नशीब तुमच्या बाजूने असेल, तुम्हाला नफा मिळेल. जे काही काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा, योग करा.

कुंभ रास
आजचा दिवस चांगला आहे. टेक्नोलॉजीचा मदतीने ऑफिसची कामं पूर्ण करा, वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या डील मिळू शकतात. तुम्हाला चांगली नफा मिळेल, नवीन ग्राहक जोडले जातील. विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचं ऐकावं, त्यांचा सल्ला घ्यावा, प्रगती होईल. आज तुमचं आरोग्य ठीक असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

मीन रास
आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला चांगली मदत करतील, तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार असेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असील तर नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अन्यथा तुम्हाला शिक्षकांकडून ओरडा पडेल. शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)