
Komodo Dragon Deer Hunt Video: जंगलात काय घडेल याचा नेम नाही. प्राण्यांशी संबंधित धक्कादायक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचं जग भयानक असतं. तिथे चपळ, चलाख, भयानक प्राणी अस्तित्वात असतात. या प्राण्यांची रोज जीव वाचवण्यासाठी धडपड असते. कधी कुणी कुणाचं शिकार असतं तर कधी कुणी कुणाचा शिकारी असतो. निसर्गाची भयंकर आणि थरारक बाजू पाहायची असेल तर जंगलातील शिकार हे दृश्य कधीही चुकवू नये.
जगभरात हजारो प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. काही मन मोहवणारे, तर काही अंगावर शहारे आणणारे. अशाच एका ‘दैत्याकार’ शिकाऱ्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसतेय, जगातील सर्वात भयंकर कोमोडो ड्रॅगन, जो वाघापेक्षाही शांतपणे पण मृत्यूसारखा अचूक हल्ला करतो. त्याने हरणावर घेतलेली झडप, त्याचा वेग पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे आणि निसर्गातला हा असा थरारक क्षण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकरी अक्षरशः थरथरले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसतेय, महाकाय कोमोडो ड्रॅगनने हरणाची शिकार केली आहे.
व्हिडीओमध्ये दिसतं की, कोमोडो ड्रॅगन जंगलात अगदी सावधपणे आणि शांतपणे एका निष्पाप हरणाचा पाठलाग करतो. काही क्षण तो दबा धरून बसतो आणि मग अचानक विजेच्या वेगाने झडप घालतो. हरणाला सावरायलाही वेळ मिळत नाही आणि तो क्षणार्धात ड्रॅगनच्या जबड्यात अडकतो.
कोमोडो ड्रॅगनचा हा हल्ला इतका वेगवान आणि प्रखर होता की हरीण काहीच करू शकले नाही. काही सेकंदात ते पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडले. कोमोडोची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा विषारी चावा, जो शिकारीला हळूहळू मृत्यूच्या दारात नेतो. हरण तडफडत राहते, पण ड्रॅगनच्या विषारी लाळेमुळे त्याची ताकद हरवत जाते.
या थरारक दृश्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओवर लाखो व्ह्युज आ
णि हजारो कमेंट्स आल्या असून लोक कोमोडोच्या या शिकारकलेला भीतीदायक म्हणत आहेत. काही जणांनी याला निसर्गाची क्रूर पण सत्य बाजू म्हटलं. कोमोडो ड्रॅगनची ताकद, रणनीती आणि शिकारीची शैली पाहून अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केलं.