माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसापासून उपोषणाला बसले होते. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये हे आंदोलन सुरु होते. आज सरकारच शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी आलं होते. सरकारच शिष्टमंडळावर विश्वास दाखवत प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी हे आमरण उपोषण मागे घेतले असून स्थगित केले असल्याचे जाहीर केले आहे.
जालन्यात वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु होतं. आज सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या शिष्टमंडळाने पटवून दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं.
आपलं आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आहे. मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एकदोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमची 56 हजार गावे वंचित आहे. एक हजार पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
सरकारच्या शिष्ट मंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. जालना वडीगोद्रीत ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली आहे. उपोषणस्थळी ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली होती.