सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी भाव वाढ ठरली आहे. सध्या पितृपक्षामुळे सराफा बाजार सुस्त असला तरी देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत 75 हजार रुपयांच्या ही पुढे गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 75 हजार 730 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही 90 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसतंय.
देशाच्या राजधानीत दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 420 रुपये झाला असून प्रति दहा ग्रॅम साठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,135 रुपये झाली आहे. चांदीची किंमत किलोमागे 92 हजार 720 रुपये झाल्याने सोन्या चांदीचे दर ऐकूनच खरेदीदारांना घाम फुटला आहे.
सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार
मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसत असताना आज अमेरिकी कॉमिक्सवर सोन्याची किंमत 2685.300 प्रति अंश इतकी होती तर चांदीची किंमत 32.17 डॉलर प्रति अंश इतकी झाली आहे. आतापर्यंतचा सोन्याचा हा भाव उच्चांकी असल्याचं सांगण्यात येतंय. सोन्या चांदीच्या किमतीत वेगाने वाढ होत आहे. या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २८ टक्क्यांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत बाजारात १९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.
कोणत्या शहरात सोन्याचा भाव काय?
नवी दिल्ली- 75 हजार 590 प्रति दहा ग्रॅम (24 कॅरेट)
मुंबई- 75 हजार 720 प्रति दहा ग्रॅम
पुणे- 75 हजार 720 प्रति 10 ग्राम
औरंगाबाद- 75 हजार 720
नागपूर- 75 हजार 720
नाशिक- 75 हजार 720
22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम 69,254 रुपयांचा भाव राज्यातील बहुतांश शहरांमध्ये मिळत असल्याचे दिसून आले.
चांदीचा भाव काय?
चांदीचा दरही वेगाने वाढत असून एक किलो चांदी मागे खरेदीदार यांना 92 हजार 580 रुपये द्यावे लागत आहेत. मुंबईत एक किलो मागे चांदीची किंमत 92 हजार 740 रुपये झाली असून महाराष्ट्रातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये चांदीचा असाच भाव आहे. आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून किलोमागे 1922 रुपयांची ही वाढ आहे. यापूर्वी चांदीचा भाव 88,402 रुपये होता.
सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता
आतापर्यंतची सोन्याच्या भावातील ही उच्चांकी वाढ नोंदविण्यात येत असून सोन्याच्या इतर सर्व मालमत्तांमध्ये ही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम साठी 78,000 रुपयांपर्यंत वाढवू शकतो तर चांदी ही एक लाख रुपये किलो पर्यंत पोहोचू शकते असा अंदाज सरफा बाजार तज्ञांकडून वर्तवला जातोय.