माणदेश एक्सप्रेस न्युज/ पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सात वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला जीवे मारल्याची घटना घडली होती. या घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या; या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे.
रविवारीच्या मध्यरात्री अत्याचार पीडित मृत मुलीच्या घराच्या बाजूला वाढदिवस साजरा केला जात होता. याच वाढदिवसाला मुलगी गेली असताना तिला संशयिताने निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. रात्री उशिरा झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून साडे अकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी शोध घेतला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करत मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला होता. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता.