एमपॉक्समुळं आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर, आतापर्यंत 27 हजार रुग्ण आढळले असून 1100 रुग्णांचा मृत्यू

0
363

 

जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांपूर्वी देखील एमपॉक्सच्या वाढत्या संसर्गामुळं आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली होती. जे पुरुष दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतात त्यांना या आजारामुळं त्रास झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत लोकांना जागरुक देखील केलं होतं. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं होतं. आफ्रिकेतील देशांमध्ये एमपॉक्स संक्रमण सार्वजनिक आरोग्य विषयक समस्या राहिलेली आहे. एमपॉक्सचा पहिला रुग्ण 1970 मध्ये कांगोमध्ये आढळून आला होता.

एमपॉक्सचा सध्याचा वाढलेला संसर्ग देखील कांगोत पाहायला मिळतो. या आजारामुळं लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून संसर्गापासून वाचण्यासाठी जनजागृती अभियान राबवलं जात आहे. कांगोत जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 27 हजार रुग्ण आढळले असून 1100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एमपॉक्स आजाराचा फटका मोठ्या प्रमाणावर मुलांना बसला आहे.

एमपॉक्समुळं कुणाला धोका?
एमपॉक्सचा सर्वाधिक धोका लहान मुलं, महिला आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना असतो. यामध्ये एचआयवीग्रस्त लोकांचा समावेश देखील असतो. कांगोमध्ये एमपॉक्सचे दोन स्ट्रेनचा प्रसार वेगानं होतं आहे. एनडेमिक फार्म आणि त्याचं नवं रुप या दोन्हीचा प्रसार होत आहे. एमपॉक्सच्या लक्षणांमध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, थकवा जाणवणे अशी त्याची लक्षणं असून या आजारामुळं जीव देखील जाऊ शकतो.

एमपॉक्सच्या विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा वेगानं प्रसार होत असल्यानं वैद्यकीय क्षेत्रात चिंता आहे. कांगोमध्ये काही शिबिरांमध्ये मुलांमध्ये या विषाणूचा प्रसार होत आहे. एमपॉक्स पूर्व कांगो तून युगांडा, रवांडा, बुरुंडी आणि केनियात पसरलेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्सला जागतिक आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर केल्यानं कांगोला आता अधिक वैद्यकीय उपकरणं मिळतील, निधी जमवण्यात मदत होईल. कांगोमधील अधिकाऱ्यांना या आजाराचा सामना करता मदत होऊ शकते. विषाणूचा अभ्यास करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी चांगल्या नियंत्रणाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्सला रोखण्यासाठी 34 दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र, यावेळी त्याचा फायदा झाला नव्हता. एमपॉक्स प्रभावित भागात लसीदेखील पोहोचल्या नव्हत्या. लसीकरण प्रक्रिया राबवण्यात अडचणी आल्या होत्या. दोन वर्षानंतर देखील तशीच स्थिती आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here