ताज्या बातम्यागुन्हे

मोबाईल फोन वापरण्याच्या वादानंतर आईने केली मुलीची हत्या ;डोक्यावर केले रॉडने वार

आजकाल मुले मोबाईल व्यसनाच्या आहारी जात आहेत. आई-वडिलांना नेहमीच याची काळजी असते. आता जयपूरमधून मोबाईल फोनच्या अतिवापराबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी मोबाईल फोन वापरण्यावरून झालेल्या वादानंतर आईने आपल्या मुलीची हत्या केली आहे. आईने मुलीच्या डोक्यावर रॉडने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यावेळी महिलाही जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला, तर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना बिंडायका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडियारामसर येथे घडली असून, मुलीच्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिंडायका पोलीस स्टेशनचे अधिकारी भजनलाल यांनी सांगितले की, ब्रजेश सिंह यांची 22 वर्षीय मुलगी निकिता सिंग स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. निकिताला मोबाईलचे व्यसन लागलेले होते. ती सतत फोनवर असायची.

सोमवारी तिची आई सीता मोबाईल लपवून कामावर गेली. त्यानंतर मोबाईल लपवण्यावरून आई आणि मुलीमध्ये वाद झाला आणि प्रकरण हाणामारीत पोहोचले. त्यानंतर संतापलेल्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यात रॉडने वार केले. भजनलाल यांनी सांगितले की, डोक्याला मार लागल्याने निकिता बेशुद्ध झाली आणि तिला एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुसरीकडे आईने ही हत्या आत्महत्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेहाच्या मानेवर लटकल्याची कोणतीही खूण नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

घटनास्थळी पोलिसांना साडी आणि रक्ताचे डाग आढळून आल्याने प्रकरण संशयास्पद वाटले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निकिता मोबाईलवर जास्त वेळ घालवत असे, या कारणावरून त्याच्या कुटुंबीयांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी तिचा मोबाईल काढून घेतला होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानुसार पुढील कारवाई केली जाईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button