मोबाईल एका मिनिटात तर इलेक्ट्रिक वाहन होणार 10 मिनिटांत फुल चार्ज; भारतवंशीय संशोधकाचे उत्तेजनार्थ काम

0
2

तुमची उपकरणे केवळ एक ते 10 मिनीटांमध्ये पूर्ण चार्ज करु शकतात. होय, अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील रासायनिक आणि जैविक अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने हे नवीन तंत्रज्ञान शोधले आहे. जे इतक्या कमी वेळात मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनसुद्धा चार्ज करु शकते. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार उल्लेखनिय असे की, अंकुर गुप्ता हे भारतीय वंशाचे आहेत.

सुपरकॅपॅसिटर एक ऊर्जा साठवण यंत्र
प्राध्यापक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने शोधलेले हे नवीन तंत्रज्ञान ‘प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात, संशोधकांनी सूक्ष्म छिद्रांच्या जटिल नेटवर्कमध्ये आयन-लहान चार्ज केलेले कणांची हालचाल शोधली. गुप्ता यांच्या मते, सुपरकॅपेसिटरसारख्या अधिक कार्यक्षम स्टोरेज उपकरणांच्या विकासाला या यशस्वी शोधामुळे गती मिळू शकते. “सुपरकॅपॅसिटर हे एक ऊर्जा साठवण यंत्र आहे. जे त्यांच्या छिद्रांमध्ये आयन गोळा करण्यावर अवलंबून असते. बॅटरीच्या तुलनेत, सुपरकॅपॅसिटर जलद चार्जिंग वेळा आणि दीर्घायुषी ठरतात.”
हरवलेली वाट सापडली

गुप्ता ‘Phys.org’च्या अहवालात म्हणाले, “ग्रहाच्या भविष्यात ऊर्जेची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता, मला माझे रासायनिक अभियांत्रिकी ज्ञान ऊर्जा साठवण उपकरणे विकसित करण्यासाठी लागू करण्याची प्रेरणा वाटली. असे वाटले की हा विषय काहीसा कमी शोधला गेला आहे आणि त्यासाठी ही एक परिपूर्ण संधी आहे.” ते पुढे म्हणाले, “सुपरकॅपेसिटरचे प्राथमिक आकर्षण त्यांच्या गतीमध्ये असते. मग आपण त्यांचे चार्जिंग आणि उर्जेचे प्रकाशन जलद कसे करू शकतो? आयनच्या अधिक कार्यक्षम हालचालीद्वारे. हीच कामाची झेप आहे. आम्हाला आमची हरवलेली वाट सापडली आहे.” सुपरकॅपॅसिटर तंत्रज्ञानातील ही प्रगती ऊर्जा साठवणुकीच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणू शकते, जलद चार्जिंगला वास्तविकता बनवू शकते आणि वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक्सपासून इलेक्ट्रिक वाहने आणि पॉवर ग्रिडपर्यंत सर्व काही कसे पॉवर करतो याचे संभाव्य रूपांतर होऊ शकते.

दरम्यान, विद्यमान स्थितीतील बाबी विचारात घेता इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात आले आहेत. मात्र, त्यांना चार्ज करण्यसाठी लागणारी उर्जा आणि वेळ अधिक आवश्यक असतो. तसेच, चार्जिंग पॉइंटही सहज उपलब्ध नसतात. परिणामी लोकांची गैरसोय होण्याचेच प्रमाण अधिक असते. अशा वेळी, कमी वेळात अधिक चार्ज होणारे उपकरण आल्यास नागरिकांसाठी तो मोठा दिलासा ठरू शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here