आम. गोपीचंद पडळकर यांचा माजी मुख्यमंत्री यांच्यावर हल्लाबोल म्हणाले, भगवा आमचा स्वाभिमान, त्यांचा संबंध आता…

0
3

आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच, भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल, असंही गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, देशात आणि राज्यात जे लोकं मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा अवाका किती आहे? हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीनं डबक्यातले बेडूक डराव डराव करतात, त्याच पद्धतीनं ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे. यांना प्रचंड मर्यादा आहेत. यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत.”, असंही वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.