रोजगाराच्या आघाडीवर मोठी सुवार्ता आली आहे. वाहन निर्मिती करणारी जगविख्यात कंपनी बर्सडिजी बेंज महाराष्ट्रात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात येत असल्याच्या विरोधकांच्या आरोपानंतर ही उद्योगविश्वासाठीची मोठी घडामोड मानण्यात येत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी जर्मनीमधील स्टुटगार्ट येथील बेंझच्या प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी कंपनीने राज्यात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी तयारी चालविल्याचे दिसून येत आहे.
उद्योगांना प्रोत्साहन
गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने देशभरात औद्योगिक धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. अजूनही बदलाचे वारे वाहतच आहे. भारतीय स्टार्टअप्स, युनिकॉर्न कंपन्यांनी मोठी भरारी घेतली आहे. नवतरुण नवनवीन उद्योग उभारत आहेत. तर अनेक जागतिक ब्रँडने भारताकडे आगेकूच सुरु केली आहे. चीनमधील प्रकल्प गुंडाळून काही कंपन्यांनी भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे. मोबाईल, तंत्रज्ञान, वाहन निर्मिती आणि इतर क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना भारतीय बाजार खुणवत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. पण औद्योगिक आघाडीवर वादाचे फड रंगले होते. राज्यातील काही उद्योग गुजरातला पळविण्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. त्यासाठी अनेक पुरावे पण सादर करण्यात आले होते. त्यामुळे महायुतीची मोठी कोंडी झाली होती. नवीन उद्योग राज्यात येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज… pic.twitter.com/w6xMBbhj47
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याविषयीची माहिती दिली. जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडीज बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. बेंझ यंदा राज्यात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे राज्यात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होईल. यासंदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी मर्सिडीज बेंझ कंपनीचे संचालक सदस्यांशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.