युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तरुणाकडून प्रेयसीला मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद

0
2

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एमीटी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने तरुणीला अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना एकाने फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. ही घटना सेक्टर 126 मध्ये असलेल्या एमिटी युनिव्हर्सिटीचा असल्याचा दावा केला जात आहे. दोघे जण कोणत्या कारणावरून भांडण करत होते ते अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडण करणारे तरुण तरुणी रिलेशनशिपमध्ये असल्याचा वृत्त आहे. दोघांमध्ये काही कारणावरून भांडण होते या भांडणाचे रुपांतर मारामारीत होते. तरुण पीडितेला मारहाण करत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण पीडितेच्या कानाखाली लगावतो. त्यानंतर तोंडावर चापट मारतो आणि नंतर तिला जमिनीवर ढकलतो. तरुणी त्याला मारण्यासाठी उभी राहते त्यानंतर तो मागे वळून पुन्हा तिच्या तोंडांवर चापट मारतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिला पोलिसांनी दखल घेतली आहे. नोएडा पोलिसांनी सांगितले की, यावर लवकरच कारवाई करण्यात येईल. कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशन देण्यात आले आहे. पोलिस या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या व्हिडिओला अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here