
Ghee foot massage benefits : पायांच्या तळव्याची मालिश केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. दिवसभराचा थकवा देखील दूर होतो. अनेकजण तळपायाचा मसाज करण्यासाठी राईच्या तेलाचा वापर करतात. परंतु, आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्याला तुपाने मालिश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
पायांच्या तळव्याला तुपाने मालिश केल्यास सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो.
तळपायांची मालिश केल्याने दृष्टी सुधारते. डोळ्यांवर आलेला ताण आणि थकवा निघून जाण्यास मदत होते.
आपल्याला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तळपायांना तुपाने मालिश करा. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. तसेच मानसिक आरोग्य देखील सुधारते.
तुपाने तळव्यांना मालिश केल्यास पचनसंस्था मजबूत होते. तळपायाच्या प्रेशर पॉइंटवर मसाज केल्यास गॅस आणि अपचनाची समस्या दूर होईल.
त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर पायांना तुपाने मालिश करा. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळेल. तसेच त्वचा कोरडी होण्यापासून सुटका होईल.