
Shocking Video Viral: एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यावर शोक व्यक्त केला जातो. सगळीकडे शोकाकुल वातावरण असतं. डोळ्यांत अश्रू, मनात हळहळ आणि साऱ्या वातावरणात गूढ शांतता असते. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने साऱ्यांना धक्का दिला आहे. तुम्ही अनेकदा कोणाच्या लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात डीजेवर लोक नाचताना पाहिले असतील. पण, तुम्ही कधी एखाद्याच्या अंत्ययात्रेत डीजे लावलेला आणि त्यावर लोक नाचताना पाहिले आहेत का? तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण असा प्रकार नुकताच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओद्वारे समोर आला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. तुम्हाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्यांचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल. आता असाच एक विचित्रच प्रकार सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. चक्क अंत्ययात्रेत लोक नाचताना आणि गाताना दिसत आहेत. ही अंतिम यात्रा नव्हे तर एखादा जल्लोषात निघालेला सोहळा वाटावा, असा अनुभव हा व्हायरल झालेला व्हिडीओ देतोय. हा व्हीडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक शवयात्रा निघाली आहे, पण ती पारंपरिक शोकमय नाही, तर डीजेच्या तालावर ठेका धरत गावकऱ्यांनी साजरी केली आहे. तिरडी फुगे, झेंडूच्या फुलांनी सजवलेली असून, चार जणांच्या खांद्यावर पुढे जात आहे. मागे सारा गाव डीजेवर बेभान नाचतोय, जणू एखाद्या नवरदेवाची वरात आहे.
व्हिडीओतील कॅप्शनमध्ये म्हटलंय, “वाटतंय की सगळं गाव आजीवर खूप नाराज होतं!” अर्थात, ही एक हलकीफुलकी प्रतिक्रिया असली तरी काही युजर्सनी स्पष्ट केलं आहे की, ज्या आजींची मृत्यू यात्रा होती, त्या जवळपास १२० वर्षांच्या होत्या. अशा दीर्घ आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर काही ठिकाणी आनंदाने निरोप दिला जातो.
हा व्हिडीओ काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला आहे. काही युजर्सनी याला “अनोखी परंपरा” म्हटलं आहे, तर काहींनी “संस्कृतीचा अपमान” अशी टीका केली आहे. एकाने म्हटलं, “अशा मृत्यूवर आनंदच वाटतो,” तर दुसऱ्याने लिहिलं, “कर्म इतकं चांगलं ठेवा की शेवटचं तोंड हसतं असेल!”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. खरंतर भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशात अशा अनेक परंपरा आणि रूढी आहेत, ज्या प्रत्येक वेळी आपल्याला आश्चर्यचकित करतात.