
नुकतीच देशभरात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी शिवगर्जना करताना दिसत आहे तर कोणी लेझीम खेळताना दिसत आहे. कोणी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढून आनंद साजरा करताना दिसत आहे तर कोणी शिवरायांचे यशोगाथा सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी लाठीकाठीचा खेळ सादर करताना दिसत आहे. या रणरागिणीची ही कला पाहून कोणीही थक्क होईल.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील आहे. व्हिडीओत तुम्हाला एक तरुणी लाठीकाठीचा खेळ सादर करताना दिसेल. ती अतिशय सुंदर रित्या हा खेळ सादर करताना दिसते. व्हिडीओ पाहून कोणीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “मराठी संस्कृती रडायला नाही, गर्जना करायला शिकवते, महाराष्ट्राची रणरागिणी”
पुण्यातील शिवजयंती नेहमी चर्चा असते. पुण्यातील शिवजयंतीला १०० पेक्षा जास्त मिरवणुका काढल्या जातात. ढोल ताशाच्या गजरात, लेझीम नृत्य, सादर करत आनंदोत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. सोशल मीडियावर पुण्यातील शिवजयंतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मराठी संस्कृती ची सुंदरता” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तू हो मर्दानी झाशी ची राणी, तू बन दुर्गा आणि माता काली” तर एका युजरने लिहिलेय, “ही आहे आपल्या महाराष्ट्राची खरी संस्कृती” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही आहे आपली खरी संस्कृती आणि तिकडे बुलेटवाले गाड्या घेऊन निघतात आणि नुसता त्रास लोकांना. काय तर लोकांना दाखवायला हवं. अरे असं दाखवा.” एक युजर लिहितो, “हा आहे आपला भारत. जय भवानी” काही युजर्सनी जय शिवराय लिहिलेय तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.