
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील वयोवृद्ध महिलेला मारहाण करत तिच्या अंगावरील दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची आटपाडी नोंद झाली आहे.
सदर घटने बाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वयोवृद्ध महिला रत्नप्रभा या जात असताना अनोळखी इसमाने महिलेच्या अंगावरील चार तोळयाच्या सोन्याच्या बांगड्या, कानातील फुले व वेल एक तोळे, अर्धा तोळ्याची बोरमाळ, दीड तोळयाचा लक्ष्मी हार, व मोबाईल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल महिलेस खाली पाडून, मारहाण करत, अंगावरील दागिने जबदस्तीने काढून घेतले. यावेळी फिर्यादीस दुखावत झाली. या घटनेमुळे करगणी परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.