मल्याळम अभिनेता विनायक याला इंडिगोच्या गेट स्टाफसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक

0
84

रजनीकांत स्टारर ‘जेलर’ मधील अभिनेता विनायकन सध्या चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनायकनला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अभिनेत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर दारूच्या नशेत विनायकनने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गैरवर्तन केले. त्यामुळे पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, इंडिगोच्या गेट स्टाफसोबत अभिनेत्याने गैरवर्तन केले. यावेळी विनायकन मद्यधुंद अवस्थेत होता. बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक करून गुन्हा दाखल केला. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, जेलर फेम अभिनेता हैदराबादहून गोव्याला जात होता. तथापी, अभिनेत्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर जमिनीवर शर्टलेस बसलेला दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये तो ओरडताना आणि गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे.

विनायकनला सूचना देऊनही तो गोंधळ घालतचं होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या CISF च्या टीमने त्याला अटक केली. यानंतर अभिनेत्याला स्थानिक विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हैदराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस ठाण्याचे सीआय बलराज यांनी सांगितलं की, या प्रकरणी अनिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासही सुरू करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here