केरळच्या त्रिशूरमध्ये जाणवले भूकंपाचे हलके झटके!

0
4

केरळ मधील त्रिशूर मध्ये काही भागांत शनिवारी भूकंपाचे हलके झटके जाणवले. ज्याची तीव्रता रिक्टर 3.0 मोजली गेली. अधिकारीक सूत्रांनी ही माहिती दिली की, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रने सांगितले की, आज सकाळी 8.15 वाजता क्षेत्रामध्ये 3.0 तीव्रतेचा भूकंप झाला.

त्रिशूर जिल्हाधिकारींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के चार सेंकंद पर्यंत जाणवले. पण यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. एनसीएस ने ‘एक्स’ वर पोस्ट केले की, भूंकपाचा केंद्र 10.55 डिग्री उत्तरी अक्षांश आणि 76.05 डिग्री पूर्वी देशांतर वर 7 किलोमीटर खोलवर होता. अधिकारींनी सांगितले की भूकंपाचे झटके कुन्नमकुलम, एरुमापपेटी, पँझाजी क्षेत्रात तसेच पलक्कड जिल्ह्यातील काही भागांमध्ये जाणवले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here