माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बीड लोकसभेच्या पराभूत उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. कारण ओबीसी आणि मराठा समाज तेढ निर्माण झाला होता, असं बोललं जात होतं. यामुळेच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती.
यासोबतच लोकसभेत भाजपला शेतकऱ्यांचाही मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते, सदाभाऊ खोत यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. तसेच पुणे येथील माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. योगेश टिळेकर हे देखील एक ओबीसी चेहरा आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होतानाच दिसत आहे. याचं कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपचे 5, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2 आणि महाविकास आघाडीकडूनही 2 उमेदवार दिले जाणार आहेत.
भाजपकडून यांना मिळणार संधी
• पंकजा मुंडे
• योगेश टिळेकर
• परिणय फुके
• अमित गोरखे
• सदाभाऊ खोत