सिंधुदुर्ग दुर्घटनाप्रकरणातील चेतन पाटील याला कोल्हापूर गुन्हा शाखेकडून अटक

0
254

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला.या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूरच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मालवण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले.

या आधी पोलिसांनी कंत्राटदार आणि आर्किटेक्ट जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांची नावे एफआयआर मध्ये ठेवली असून त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि पुतळ्याच्या आसपासच्या लोकांना संभाव्य हानी पोहोचण्याचा आरोप केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग येथे प्रथमच नौदलाच्या दिनाच्या सोहळ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले. हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले असून वर्षाच्या आतच पुतळा कोसळला.

पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. युबीटीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी या प्रकरणामुळे राज्य सरकारला धारेवर धरले आहे.