जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यंदाचे लाल किल्ल्यावरील भाषण कधी, कुठे, कसं बघाल?

0
103

भारत येत्या 15 ऑगस्ट दिवशी 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहेत. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली मध्ये लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सलग 11 व्या वेळेस लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी भाषण करून जनतेला संबोधित करणार आहेत. हा मोदी सरकारच्या तिसर्याल टर्म मधील पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी 7.30 च्या सुमारास लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.

ब्रिटीश राजवटीच्या पारतंत्र्यातून 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून भारतीय संविधान स्वीकरत देशात लोकशाही नांदायला सुरूवात झाली. दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदाही त्याच्या सेलिब्रेशन साठी नागरिकांमध्ये उत्साह आहे. देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण कुठे पहाल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 15 ऑगस्टच्या सकाळी 7.30 च्या सुमारास पाहता येऊ शकेल. टीव्ही वर डीडी न्यूज तर ऑनलाईन हे भाषण Press Information Bureau (PIB) YouTube channel वर पहाता येऊ शकेल. सोशल मीडीयावरही PIB च्या अन्य प्लॅटफॉर्म वर हे भाषण पाहता येऊ शकेल. pmindia.gov.in, ddnews.gov.in या वेबसाईट वर लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.

78व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाची थीम?
यंदाचा भारताचा स्वातंत्र्यदिन ‘विकसित भारत’ या थीम वर साजरा केला जाणार आहे. 2047 मध्ये विकसित भारत कसा असेल याबद्दल सरकारचं असलेलं व्हिजन त्यामध्ये दिसणार आहे.

स्वातंत्र्यदिनाचा सोहळा घरा घरामध्ये नेण्यासाठी आता सरकार कडून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम चालवली जात आहे. यंदा या मोहिमेचं तिसरं वर्ष आहे. या निमित्ताने घराघरात झेंडा फडकवला जातो. नागरिकही सोशल मीडीयात तिरंगासोबतचे डीपी लावत सेलिब्रेशन मध्ये सहभागी होतात. ठिकठिकाणी सांस्कृतिक सोहळ्यांचं आयोजन केले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here