मानसिक रूपाने आजारी असणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याची हत्या

0
6

लातूर मध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. मानसिक रित्या आजारी असलेल्या व्यक्तीला मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. सांगितले जाते आहे की, या व्यक्तीवर अनेक जणांनी हल्ला केला. त्याच्या तोंडात आणि शरीरावर तिखट टाकले व त्याला मारहाण केली. मृतकाच्या कुटुंबाने पोलिसात तकार दाखल केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टम करीत पाठवला. कुटुंबाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकची मानसिक अवस्था स्थिर न्हवती. तर घटनेच्या दिवशी या मृतकाने गावातील काही व्यक्तींना रस्त्यावर मारहाण केली व त्यातील एका व्यक्तीला मृतकाने लोखंडी रॉड मरून गंभीर जखमी केले. व मृतकाने दारू पिली होती ज्यामुळे त्याला भान नव्हते. व त्याने दारूची बाटली फोडून लोकांवर हल्ला केला. त्यांनतर लोकांनी स्वतःचा बचाव करीत या मृतकाला पकडून बांधले.

अधिकारींनी सांगितले की, यानंतर लोकांनी या मृत पावलेल्या व्यक्तीला मारहाण केली. ज्यामध्ये त्याच्या मृत्यू झाला. व पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील चौकशी करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here