नोकरीची संधी: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची भरती

0
235

केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ची ‘कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम २०२४ (CGL-2024)’ २४ जून २०२४ रोजी जाहीर झाली आहे.
केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ची ‘कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम २०२४ (CGL-2024)’ २४ जून २०२४ रोजी जाहीर झाली आहे. ही जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या https:// ssc. gov. in या संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेमधून पुढील एकूण १७,७२७ पदांची भरती होणार आहे.

विभाग/मंत्रालय निहाय रिक्त पदांचा तपशील –

(1) पे-लेव्हल-७ (रु. ४४,९००/- १,४२,४००/-) अंदाजे वेतन रु. ८४,८००/- असलेली सर्व पदे (ग्रुप-बी) (इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स वगळता)

असिस्टंट सेक्शन ऑफिसर ((१) सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस (CSS), (२) आयबी, (३) रेल्वे, (४) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, (५) एएफएचक्यू, (६) MoE IT)

असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर (७) केंद्र सरकारची इतर मंत्रालये आणि इतर खात्यांमधील)

इन्स्पेक्टर – (८) CBDT मधील, (इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर (ग्रुप ‘सी’) (९) CGST सेंट्रल एक्साईज, CBIC (१०) प्रिव्हेंटीव्ह ऑफिसर, (११) एक्झामिनर (१२) असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर (ईडी)

(१३) सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय)

इन्स्पेक्टर (१४) पोस्ट, (१५) सीबीएन्

(II) पे लेव्हल-६ (रु. ३५,४००/- ते १,१२,४००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/- असलेली पदे (ग्रुप-बी)

(१६) असिस्टंट/ असिस्टंट सेक्शन ऑफिसर (इतर मंत्रालये/खाती)

(१७) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (CBIC)

(१८) रिसर्च असिस्टंट (NHRC)

(१९) डिव्हिजनल अकाऊंटंट (सी अँड एजी)

(२०) सब इन्स्पेक्टर (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) (एन.आय.ए.)

(२१) सब इन्स्पेक्टर/ज्यु. इंटेलिजन्स ऑफिसर (NCB, MHA)

(२२) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर (स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम एम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री)

(III) पे लेव्हल-५ (रु. २९,२००/- ९२,३००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/- असलेली पदे (ग्रुप-सी) ऑडिटर

(२३) सी अँड एजी, (२४) सीजीडीए, (२५) इतर मंत्रालये, अकाऊंटंट (२६) (सी अँड एजी); (२७) कंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स, (२८) अकाऊंटंट/ ज्युनियर अकाऊंटंट (केंद्र सरकारची इतर खाती)

(IV) पे लेव्हल-४ (रु. २५,५००/- ८१,१००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,५००/- असलेली पदे (ग्रुप-सी)

(२९) पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट)

(३०) सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट/ अप्पर डिव्हिजन क्लर्क केंद्र सरकारची विविध खाती) (CSCS कॅडर वगळता)

(३१) सिनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – MES MOD

टॅक्स असिस्टंट – [(३२) इन्कम टॅक्स (सीबीडीटी), (३३) सीबीआयसी]

(३४) सब इन्स्पेक्टर (सी.बी.एन.)

वरील पदांसाठीचा पसंतीक्रम अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी कमिशनच्या वेबसाईटवर ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरून द्यावयाचा आहे. पदांनुसार/ कॅटेगरीनिहाय रिक्त पदांचा तपशील नंतर जाहीर केला जाईल. (https:// ssc. gov. in; For Candidates; Tentative vacancy)

पात्रतेच्या अटी : शैक्षणिक अर्हता दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी –

(१) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदवी (कोणत्याही शाखेतील) (१२ वीला गणित विषयांत किमान ६० टक्के गुण आवश्यक किंवा पदवी (कोणत्याही विषयातील) आणि पदवी स्तरावर स्टॅटीस्टिक्स हा एक विषय अभ्यासलेला असावा.)

(२) रिसर्च असिस्टंट (NHRC) पदवी उत्तीर्ण. इष्ट पात्रता युनिव्हर्सिटी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमधील किमान १ वर्षाचा रिसर्चमधील अनुभव आणि डिग्री इन लॉ किंवा ह्युमन राईट्स.

(३) इतर सर्व पदांसाठी पदवी (कोणत्याही शाखेतील)

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना संबंधित पात्रता १ ऑगस्ट २०२४ पर्यंत प्राप्त करावी लागेल.)

माजी सैनिकांसाठी फक्त ग्रुप-सी मधील पदे राखीव आहेत.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी पे लेव्हल-७, पे लेव्हल ६ वरील पद क्र. १ ते २१ साठी ३० वर्षेपर्यंत.

पद क्र. २२ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ३२ वर्षेपर्यंत.

ग्रुप ‘सी’ पदांसाठी – पे लेव्हल-५ व पे लेव्हल-४ वरील पद क्र. २३ ते ३४ – २७ वर्षे.

(पद क्र. १, ३, ४, ५ व १३ साठी किमान वयोमर्यादा आहे २० वर्षे, (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट २००८ नंतरचा नसावा.) इतर सर्व पदांसाठी १८ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. १ ऑगस्ट २००६ नंतरचा नसावा.))

उच्चतम वयोमर्यादेत सूट अजा/अज उमेदवारांसाठी अजा/अज – १५ वर्षे] माजी सैनिक सेना दलातील सेवा (disabled) ठरलेले उमेदवार ३ वर्षे, अजा/अज ८ वर्षे) ५ वर्षे, इमाव ३ वर्षे [दिव्यांग खुलागट १० वर्षे, इमाव-१३ वर्ष, ३ वर्षे; (परदेशातील शत्रूबरोबरील किंवा अशांत क्षेत्रातील कारवाईत अक्षम

वयोमर्यादा : (परित्यक्ता/ विधवा/ कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला खुलागट ३५ वर्षे, अजा/अज ४० वर्षे). (किमान ३ वर्षे सेवा पूर्ण केलेले केंद्र सरकारचे कर्मचारी ग्रुप सी पदांसाठी उच्चतम वयोमर्यादा खुलागट ४० वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे).

शारीरिक मापदंड : (१) इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साईज/ एक्झामिनर/ प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर) व (इन्स्पेक्टर व सबइन्स्पेक्टर सीबीएन) –

उंची : पुरुष – १५७.५ सें.मी., (अज (शिड्यूल्ड ट्राईब) १५२.५ सें.मी.), पुरुष छाती ७६ ते ८१ सें.मी. महिला उंची १५२ सें.मी. (अज १४९.५ सें.मी.), महिला वजन ४८ कि.ग्रॅ. (अज ४६ कि.ग्रॅ.)

शारिरीक क्षमता चाचणी (PET) पुरुष (?) १,६०० मीटर अंतर १५ मिनिटांत चालणे, (ii) ८ कि.मी. अंतर सायकलने ३० मिनिटांत पार करणे, महिला (i) १ कि.मी. अंतर २० मिनिटांत चालणे, (ii) ३ कि. मी. अंतर सायकलने २५ मिनिटांत पार करणे.

सायकलिंग टेस्ट सीबीएन सब-इनस्पेक्टर पदासाठी लागू नाही.

(२) सब इन्स्पेक्टर (सीबीआय) उंची पुरुष १६५ सें.मी. (अज १६० सें.मी.), महिला १५० सें.मी. (अज – १४५ सें.मी.), पुरुष छाती ७६ सें.मी. फुगविलेली. दृष्टी (चष्म्यासह चष्म्याशिवाय) दूरची दृष्टी ६/६ व ६/९, जवळची दृष्टी ०.६ व ०.८

(३) सब इन्स्पेक्टर (एनआयए) उंची पुरुष १७० सें.मी. (अज १६५ सें.मी.), महिला १५० सें.मी. (अज १४५ सें.मी.), छाती पुरुष ७६ सें.मी. फुगविलेली. दृष्टी (चष्म्यासह / चष्म्याशिवाय) दूरची दृष्टी ६/६ व ६/९, जवळची दृष्टी ०.६ व ०.८

(४) NCB मधील सब इन्स्पेक्टर/ज्यु. इंटेलिजन्स ऑफिसर उंची पुरुष १६५ सें.मी., महिला १५२ सें.मी.; छाती – पुरुष – ७६-८१ सें.मी. दूरची दृष्टी चष्म्यासह / चष्म्याशिवाय ६/६, ६/९; जवळची दृष्टी – ०.६, ०.८

सर्व परीक्षांसाठीचे अॅडमिशन सर्टिफिकेट्स संबंधित रिजनल ऑफिसच्या संकेतस्थळावरून जारी केले जातील. वेस्टर्न रिजनसाठी वेबसाईट आहे www. sscwr. net. रिजनल हेल्पलाईन (WR) मुंबई ०९८६९७३०७००/ ०७७३८४२२७०५.

निवड पद्धती : सीजीएल -२०२४ परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाणार आहे. (टीयर। आणि टीयर-।।)

(१) यातील पहिल्या स्तरावरची परीक्षा (टीयर-1) सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४ दरम्यान घेतली जाईल. यातून सीजीएलच्या (टीयर-।।) दुसऱ्या स्तरासाठी उमेदवार निवडले जातील.

(२) टीयर-।। परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल.

टीयर-। आणि टीयर-।। या दोनही परीक्षा संगणक आधारित ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.

अंतिम निवड यादी टीयर -॥ मधील गुणवत्तेवर आधारित बनविली जाईल. प्रत्येक उमेदवाराला टीयर-।, टीयर – ॥ मध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यामध्ये सेक्शनल कटऑफ प्रस्तावित नाही.

टीयर-। मध्ये (अ) जनरल इन्टेलिजन्स/ रिझनिंग, (ब) जनरल अवेअरनेस, (क) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, (ड) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारले जातील. एकुण गुण २००, वेळ ६० मिनिटे प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.५० गुण वजा केले जातील.

टीयर ॥ – परीक्षा पद्धती पेपर-१ (सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.) सेशन-१ व सेशन-२ एकाच दिवशी घेतले जातील.

सेशन-१ (वेळ २ तास १५ मिनिटे, एकूण ४५० गुण) सेक्शन-१ मॉड्युल- १ मॅथेमॅटिकल अॅबिलिटीज ३० प्रश्न; मॉड्युल- २ – रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स ३० प्रश्न, एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण गुण १८०, वेळ १ तास; सेक्शन- २ – मॉड्युल – १ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन ४५ प्रश्न; मॉड्युल २ जनरल अवेअरनेस २५ प्रश्न; एकूण ७० प्रश्न; प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण गुण २१०, वेळ १ तास; सेक्शन- ३ – मॉड्युल – १ कॉम्प्युटर नॉलेज २० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण गुण ६०, वेळ १५ मिनिटे. (फक्त पात्रता स्वरूपाची)

सेशन-१ संपल्यानंतर उमेदवारांना सेशन- २ साठी रजिस्ट्रेशन करण्याकरिता ब्रेक दिला जाईल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here