‘जाट’ पुढे ‘सिकंदर’ फ्लॉप

0
107

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा ‘सिकंदर’ 30 मार्चला ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये रिलीज झाला. पण, या चित्रपटामुळे सलमान खानच्या स्टारडमचा कस लागला. फिल्ममध्ये सलमान खान पूर्ण अॅ क्शन मोडमध्ये दिसला खरा, पण प्रेक्षकांना भाईजानचा हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. जरी पहिल्या तीन दिवसांत ‘सिकंदर’नं आपली ताकद दाखवली आणि चांगली कमाई केली. पण, त्यानंतर मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. आधीच बॉक्स ऑफिसवर अखेरच्या घटका मोजत असलेल्या ‘सिकंदर’ला, सनी देओलच्या ‘जाट’शी स्पर्धा करावी लागणार आहे.

 

 

ए.आर. मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’कडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर याला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून फारच निगेटिव्ह रिव्यू मिळाला. यामुळे, ‘सिकंदर’ची जादू चालली नाही, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सलमान खानची स्टार पॉवर देखील ‘सिकंदर’ला यशस्वी होण्यास मदत करू शकली नाही. बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी आधीच संघर्ष करत असलेला ‘सिकंदर’ आता सनी देओलच्या ‘जाट’शी स्पर्धा करत आहे. ‘जाट’ येताच त्यानं ‘छावा’चा खेळ संपवला.

 

 

सिंकदर चित्रपटानं सहाव्या दिवशी 3.5 कोटी, सातव्या दिवशी 4 कोटी आणि आठव्या दिवशी 4.75 कोटी रुपये कमावले. या चित्रपटानं नवव्या दिवशी 1.75 कोटी, दहाव्या दिवशी 1.5 कोटी आणि अकराव्या दिवशी 1.35 कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सिकंदर’नं रिलीजच्या बाराव्या दिवशी 71 लाखांचा व्यवसाय केला आहे. एकूण कमाई आता 107.81 कोटी रुपये झाली आहे.

 

 

सलमान खानचा सिकंदर बॉक्स ऑफिसवर जेमतेम काही कोटी रुपये कमवत होता आणि आता ‘जाट’नं येताच सिकंदरचा संपूर्ण खेळ खराब केला आहे. सनी देओलच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमान खानच्या चित्रपटाच्या कमाईला मोठा धक्का बसला आहे आणि ती लाखोंवर येऊन ठेपली आहे. तर ‘जाट’नं पहिल्या दिवशी 9.50 कोटी रुपये कमावले आहेत. ‘जाट’ची क्रेझ पाहता, आठवड्याच्या शेवटी त्याची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे.
फोटो : ४ ६


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here