मगर ही पाण्यातील सर्वात शक्तीशाली प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती पाण्याखाली दबा धरून बसते आणि संधी मिळताच हल्ला करते. परंतु तिचा हल्ला इतका जोरदार असतो की ती एका झटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करते. त्यामुळेच काही जण मगरीला पाण्यातील राक्षस असं देखील म्हणतात. पण याच मगरीला चक्क एका झेब्य्राने धडा शिकवला.सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका मगर आणि झेब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मगरीने झेब्रावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. मगरीने झेब्रावर हल्ला केला, पण झेब्राने मोठ्या प्रयत्नांनी स्वत:ची मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली.
नदीमध्ये एक मगर शिकारीच्या शोधात आहे. त्याचवेळी नदीतून झेब्रा जात असते. तेवढ्यात एक मगर संधी साधून झेब्य्रावर हल्ला करते. या झेब्य्राचा पाय पकडून त्याला पाण्यामध्ये खेचू लागते. पण बहुदा झेब्रा देखील या हल्ल्यासाठी तयार होता. परिणामी त्याने मगरीवर जोरदार पलटवार केला. झेब्रा संपूर्ण ताकदीने या मगरीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतो. झेब्रा काही काळ शांत उभा राहिला. अचानक त्याने पलटी मारली आणि अनपेक्षितपणे मगरीच्या तावडीतून सुटला. झेब्रा हा तसा शांत प्राणी आहे. पण जीवावर बेतल्यावर तो देखील किती घातक होऊ शकतो.
That zebra bit the damn croc 🤯 pic.twitter.com/EcUCNHTv11
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 8, 2025