मंदिर परिसरात अश्लिल कृत्य करणं महागात; जोडप्यांवर गुन्हा दाखल

0
303

मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका जोडप्यांना मंदिर परिसरात अश्लिल कृत्य करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी इंदौर येथील एमजी रोड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. जोडप्यांचा अश्लिल कृत्य करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार वकिल अभिजीत पांडे म्हणाले, कृष्णपुरा छतावर ते अश्लिस कृत्य करत होते. त्यावेळीस त्यांचा व्हिडिओ बनवला. ते माझ्या घराजवळ अश्लिल कृत्य करत होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी त्यांचे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ पोलिसांना दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला.

जेथे अश्लिल कृत्य केले तेथे देवांचे मंदिर आहे. मंदिराच्या ठिकाणी अश्लिल कृत्य करणे अयोग्य आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी या जोडप्यांवर कडक आणि जलद कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. पोलिसांनी दोघांवर एफआयआर दाखल केला. शहरातील धार्मिक स्थळी असा प्रकार घडत असून प्रशासन व संबंधित अधिकारी कोणतीच कारवाई करत नाही त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here