हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

0
268

घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आहाराकडे लक्ष देणाऱ्या महिला स्वतःच्या आहाराबाबत मात्र खूपच उदासीन असतात. उरलंसुरलं ते खायचं आणि पोटाची भूक भागवायची असं खूप जणींचं अंगदी रोजचंच आहे.

त्यामुळेच तर मग बऱ्याच महिलांच्या शरीरात लोहाची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असते, त्यांना ॲनिमियाचा त्रास होतो. म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेली काही फळं नक्कीच खाऊ शकता.

1) काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. रात्री झोपण्यापुर्वी काही मनुके पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते बारीक चावून खा.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

2) मलबेरी, ब्लू बेरी या फळांमध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. त्याशिवाय त्यातून व्हिटॅमिन सी, फायबरदेखील मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही मलबेरी, ब्लूबेरी उपयुक्त ठरते.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

3) खजूरमधूनही चांगल्या प्रमाणात लोह मिळतं. नुसते खजूर खायला आवडत नसतील तर त्याचे लाडू करा किंवा खजूर शेक करून प्या.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

4) भरपूर लोह देणारं आणखी एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबात खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

5) अनेक आहारतज्ज्ञ अंजीराला खऱ्या अर्थाने सुपर ड्रायफ्रूट म्हणतात. कारण त्यातून लोह तर मिळतेच पण त्यासोबतच फायबर, कॅल्शियम आणि इतरही अनेक पौष्टिक घटक मिळतात.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

6) आता उन्हाळा सुरू होत आहे. बाजारात टरबूज भरपूर प्रमाणात येणार. त्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी टरबूज भरपूर प्रमाणात खा. कारण त्यातूनही लोह आणि व्हिटॅमिन सी मिळते.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

7) नारळ पाणी हा देखील शरीरातील लोह वाढविण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here