“हगवणे बंधूंवरील आरोपांवर अखेर IPS मामानी मौन सोडलं “

0
571

माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे : सध्या सगळ्या राज्यात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण गाजत आहे. यामध्ये हगवणे बंधुंचे मामा जालिंदर सुपेकर यांचं सुद्धा नाव येतय. ते आयपीएस अधिकारी आहेत. शस्त्रास्त्र परवान्याच्या प्रकरणात आता जालिंदर सुपेकर यांनी मौन सोडलं आहे. त्यांचा रोख दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर होता.

 

वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे. हगवणे बंधुंकडे तीन शस्त्र आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवले. हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. नात्यात जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधुंचे मामा लागतात. आता जालिंदर सुपेकर यांनी त्या फाईलवर त्यांची जी स्वाक्षरी आहे, हगवणे बंधुंनी खोटा पत्ता दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रास्त्र परवाना मिळवला होता. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जातोय.

 

 

दरम्यान आता आयपीएस जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीनंतर आपण फाईलवर सही केली, असं जालिंदर सुपेकरांच म्हणणं आहे. जालिंदर सुपेकर त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून कार्यरत होते.

 

 

या शस्त्रास्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही आहे, हे समोर आल्यानंतर सुपेकरांच म्हणणं आहे की, पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली. मी त्याला जबाबदार नाही, असं सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधुंना शस्त्र परवाना दिला, असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. हगवणे बंधुंनी 2022 साली पुणे पोलीस ग्रामीणकडे शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

 

 

दरम्यान आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागानं दणका दिला आहे, जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचा अतिरिक्त पदभार काढल्याची माहिती मिळत आहे. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here