भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी

0
160

माणदेश एक्सप्रेस/नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सना केंद्र सरकारने दणका दिला. भारताने या चॅनेल्सवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे. यात काही युट्यूबर्स तर काही वृत्त वाहिन्यांच्या चॅनेल्सचा समावेश आहे.

 

२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यामध्ये सहभाग असून, केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, सीमेवर तणाव वाढला आहे. अशात काही पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम होत आहे. त्या चॅनेल्सवर भारताने आता बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये १६ चॅनेल्सचा समावेश आहे.

 

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तरलाही दणका बसला आहे. केंद्राने बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये शोएब अख्तर, आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचाही समावेश आहे.

 

हे चॅनेल्स यूट्यूबवर सर्च केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि वा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे चॅनेल्स सद्यस्थितीत या देशात उपलब्ध नाहीये. सरकारच्या बंदीशी संबंधित अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शक रिपोर्टवर जा. असा मेसेज दाखवत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here