भारतीय महिला ऑटोरिक्षा ड्रायव्हरचा लंडन मध्ये सन्मान ;King Charles III शी देखील भेट

0
3

लंडन मधील प्रतिष्ठित पुरकाराची यंदाची मानाची विजेती आरती आहे. तिने पुरूषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी आपल्या कामाने महिलांना प्रेरणा देखील दिली आणि सुरक्षित वातावरणही निर्माण केले.
उत्तर प्रदेशच्या बहराईच गावातील 18 वर्षीय आरती या महिला ऑटोरिक्षा ड्रायव्हरचा लंडन मध्ये सन्मान झाला आहे. बंकिंगहॅम पॅलेस मध्ये King Charles III च्या भेटीनंतर तिला प्रतिष्ठीत women’s empowerment award देण्यात आला. आरतीला Amal Clooney Women’s Empowerment Award ने गौरवण्यात आले आहे.

आरतीचा सन्मान हा सरकारच्या ई रिक्षा पुढाकारात सहभाग घेत महिलांसाठी आदर्श बनण्यासाठी केला जात आहे. यामधून सुरक्षित प्रवासासोबतच महिलांमध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

“अशाच प्रकारच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या इतर मुलींना प्रेरणा देऊ शकल्याचा मला अभिमान वाटतो. या नव्या स्वातंत्र्यामुळे मला जग वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले आहे. आता मी केवळ माझीच नव्हे तर माझ्या मुलीची स्वप्नेही पूर्ण करू शकत आहे,” अशी प्रतिक्रिया आरतीने दिली आहे. किंग्स चार्ल्स III यांना भेटल्यानंतर, हा एक अद्भुत अनुभव होता असेही आरती म्हणाली. किंगला भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी माझ्या कुटुंबाला शुभेच्छाही पाठवल्या. प्रदूषित डिझेल किंवा पेट्रोलवर न चालणारी माझी ई-रिक्षा चालवायला मला किती आवडते हे मी त्यांना सांगू शकली. मी रोज रात्री माझ्या घरी रिक्षा चार्ज करते असेही आरती म्हणाली.

आरती बंकिंगहॅम मध्ये स्वागतासाठी गुलाबी रिक्षा मध्ये पोहचली होती. याद्वारा तिने केवळ वाहतूकी व्यवस्थेतील शाश्वत पद्धतीचा पर्याय ठेवला नाही तर यासोबत तिने एक विचार आणि अभियान देखील मांडले आहे.

किंग चार्ल्स यांनी प्रिन्स ऑफ वेल्स असताना स्थापन केलेले, प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनल आता किंग्स ट्रस्ट इंटरनॅशनलमध्ये रूपांतरित होत आहे. ते रोजगार, शिक्षण आणि एंटरप्राइझ कार्यक्रमांद्वारे 20 देशांतील तरुणांना समर्थन देण्याचे काम करत आहे. प्रिन्स ट्रस्ट वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड हा तरुण महिलांच्या जागतिक कार्याला मान्यता देतो ज्यांनी प्रतिकूलतेच्या विरोधात काम करून यश मिळवले आहे आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

लंडन मधील प्रतिष्ठित पुरकाराची यंदाची मानाची विजेती आरती आहे. तिने पुरूषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी आपल्या कामाने महिलांना प्रेरणा देखील दिली आणि सुरक्षित वातावरणही निर्माण केले. आरतीला असं जग निर्माण करायचं आहे जिथे तिच्या मुलीला अडथळांचा मार्ग नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here