चेहऱ्यावर बुक्की मारल्याने भारतीय-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू (Watch Video)

0
5

ओक्लाहोमा येथे एका 59 वर्षीय भारतीय-अमेरिकन नागरिकाचा दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर ठोसा मारल्याने मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद 22 जून रोजी रात्री 10 वाजता झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमंत मिस्त्री असे मृताचे नाव असून तो मोटेल मॅनेजर होता. हेमंत मिस्त्री हा मूळचा गुजरातचा होता. तर आरोपी रिचर्ड लुईस हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. या घटनेत दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाले होते. व्हिडीओत मिस्त्री हे आरोपीला परसरातून हकलत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. या दरम्यान आरोपीने मिस्त्री यांना त्यांच्या चेहऱ्यावर एकच ठोसा मारला आणि मिस्त्री हे रस्त्यावरच खाली कोसळले.

पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देत म्हटले की, मिस्त्री यांना जोरात मार लागल्यानेते बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे 23 जून रोजी सायंकाळी 7.40 वाजता त्यांचा मृत्यू झाला. नंतर आरोपी लुईस याला एस मेरिडियन अव्हेन्यू येथील 1900 ब्लॉकमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

दरम्यान, अमेरिकेतील टेक्सास एका किराणा दुकानामध्ये दरोडा पडला असताना गोळीबाराची (Firing) घटना घडली. या घटनेत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ही घटना 21 जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांचा (Police) तपास सुरु आहे. शुक्रवारी डॅलसमधील प्लेझंट ग्रोव्हमधील गॅस स्टेशन सुविधा स्टोअरमध्ये ही घटना घडली. दुकानात चोरी करत असताना अनेक ग्राहक उपस्थित होते. चोरट्यांनी गोळीबार सुरु केला आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. दरोडेखोरांनी एकावर गोळीबार केला. या गोळीबारच्या घटनेत भारतीय वंशाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here