टी-20 विश्वचषकातील विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा भावूक; भावनेच्या भरात चक्क स्टेडियममध्ये खेळपट्टीवर असलेले….?

0
28

टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झालेला पहायला मिळाला त्याचे डोळे स्टेडियममध्ये पाणावलेले पहायला मिळाले. भावनेच्या भरात त्याने स्टेडियममध्ये खेळपट्टीवर असलेले गवत, माती खाताना तो दिसला.

आयसीसीने रविवारी रोहितचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात कर्णधार पीचवर दाखवला होता. व्हिडीओ जसजसा पुढे जातो. तसे रोहीत पीचवरील गवत, माती खाताना दिसतो. तसेच तेथून निघण्यापूर्वी त्याने पिचवर थाप दिली आणि मानवंदना करून तेथून निघून गेला.

 

व्हिडीओ पहा-

instagram.com/reel/C80j9I5Sq7Z