माणदेश एक्सप्रेस न्युज : हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पहिला टी 20 सामना रोमहर्षक झाला. झिम्बॉब्वेनं विश्वविजेत्या भारताला 13 धावांनी पराभूत करत, जमिनीवर आणले. झिम्बॉब्वेनं भारतापुढं विजयसाठी 116 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येंचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला. यानंतर अनुभवी खेळाडू ऋतुराज गायकवाड देखील लवकर बाद झाला. ऋतुराज गायकवाडनं केवळ 7 धावा केल्या.
पदार्पण करणाऱ्या रियान परागला मोठी खेळी करण्यात अपयश आले. परागला चटारानं 2 धावांवर असताना बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या अनुभवी खेळाडू रिंकू सिंगनं मोठी निराशा केली. तो शुन्यावर बाद झाला. ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल डाव सावरतील असे वाटत असतानाच ध्रुव जुरेल 6 धावा करुन बाद झाला. यानंतर कॅप्टन शुभमन गिल 31 धावांवर बाद झाला. शुभमन गिलला झिम्बॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझानं बाद केलं. सिकंदर रझानं भारताच्या तीन विकेट घेतल्या. शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारताच्या 47 धावांवर सहावी विकेट गेली होती. यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई आणि आवेश खाननं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझा, तेंदाई चटारा, ब्रायन बेनेट्ट, वेलिंग्टन मस्कदझा, ब्लेसिंग मुझरबनी, ल्यूक जोंगवे यांनी भारताच्या फलंदाजांना रोखलं. सिकंदर रझानं तीन तर, चटारानं 2 विकेट घेतल्या.
भारताचा कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरनं दमदार गोलंदाजी केली. या दोघांनी सहा विकेट घेतल्या. तर, वेस्ली मधेवेरे, ब्रायन बेनेट्ट, मैडेंडे आणि डायोन मायर्स यांनी चांगली फलंदाजी केली. झिम्बॉब्वेचा विकेटकीपर मैडेंडेनं 29 धावा केल्यानं त्यांनी 115 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 30 धावा केल्यानं झिम्बॉब्वेला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. झिम्बॉब्वेनं भारताविरोधात 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 115 धावा केल्या. रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरनं झिम्बॉब्वेला धक्के दिले. रवि बिश्नोईनं चार विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरनं दोन विकेट घेतल्या.
Fantastic performance by Zimbabwe in the first T20I against India 👏#ZIMvIND | 📝: https://t.co/fo9Ow4hvG9 pic.twitter.com/s4TCUfdYSL
— ICC (@ICC) July 6, 2024