खरं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यादा…, पहा काय म्हणाले अजित पवार?

0
360

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेबाबत या दौऱ्या दरम्यान अजित पवार बोलताना दिसतात. ‘जनसन्मान यात्रा’ आज पुण्यात आहे. या यात्रेला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे. अजित पवारांच्या हातात हात देण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गर्दी होत आहे. या यात्रेदरम्यान अजित पवारांसोबत या भगिनी रक्षाबंधन सण साजरा करत आहेत. जुन्नर तालुक्यातही महिलांनी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.

अजित पवारांचं विधान काय?
रक्षाबंधन कार्यक्रमात आलेल्या महिलानी माझा हात धरला, ओढला… खरं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यादा माझा हात कधी ओढला नाही. तेवढ्यांदा या महिलांनी हात ओढला. पण हे सगळं बहिणीच्या नात्याने घडलं, असं अजित पवार म्हणाले. आज इथं रक्षाबंधन करताना इतक्या मोठ्या प्रमाणत महिला आलेल्या आहेत. राखी बांधताना मी विचारले की माऊली पैसे आले का तर त्या बोलल्या आल्या. मात्र काहींना अजून आले नाही. पण ते येतील आम्ही शब्दाचे पक्के आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here