आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी महत्वाची बातमी! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार ‘इतके’ आर्थिक अनुदान

0
288

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अंपगत्व झाल्यास, त्यांना ₹१० लाख/₹५ लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री @TanajiSawant4MH pic.twitter.com/nvjSJDpnad

पहा पोस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here