“मी तुमचा कान फोडीन, माझं डोकं फिरलंय…”, शिक्षिकेने घरी सोडलं नाही म्हणून चिमुकलीने दिली धमकी; पाहा मजेशीर VIDEO

0
107

Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा काळ खूप लाखमोलाचा असतो. प्रत्येक इयत्तेत नवीन अभ्यासक्रम, विषय, शिक्षक, मित्र-मैत्रिणी भेटतात आणि मजा-मस्तीही करायला मिळते. सुरुवातीला नकोशी वाटणारी शाळा शालेय शिक्षण संपताना हवीहवीशी वाटू लागते. आपल्यापैकी अनेकांनी लहान असताना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला असेल किंवा शाळेतून घरी येण्यासाठी ते रडले असतील. आता अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका शाळेतील छोट्या विद्यार्थिनिचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली शाळेतून घरी जाण्यासाठी शिक्षिकेसमोर रडताना दिसत आहे. यावेळी शिक्षिका तिला अनेक उलट-सुलट प्रश्न विचारते. त्यावर चिमुकली चिडून म्हणते, “मी तुमचा कान फोडीन.. माझं डोकं फिरलंय”. त्यावर शिक्षिका म्हणते, “असं टीचरांना म्हणायचं नसतं बाळा…”. मग चिमुकली म्हणते, “मी जाणार आहे घरी, मला घरी सोडा”. त्यावर शिक्षिका म्हणते, “तू जा मी सोडते तुला; पण टीचरांना असं म्हणायचं नसतं बाळा…” मग ती म्हणते, “माझं डोकं फिरलंय.. माझ्या पप्पांना फोन लावा.” सध्या चिमुकलीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here