‘हवं तर मला फाशी द्या पण …’ , पहा काय म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड

0
1

मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, परंतु त्यावेळी त्याच जागी अनावधानाने माझ्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला. चूक लक्षात येताच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेची मी माफी मागितली. आता मला फाशी द्या, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे, असं ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फटला. त्यानंतर राज्यभरात भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तर जितेंद्र आव्हाडांवर महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणात आव्हाडांनी माफी मागितली असली तरी भाजप आक्रमकच आहेत. या सर्वप्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली. यावेळी आव्हाडांनी असे म्हटले की, भाजप हा माझा वैचारिक शत्रू आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची दखल मी घेत नाही. माझ्याकडून चूक झाली आहे. ती मी मान्य केली आहे. महात्मा फुलेंवर बोलणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवाजी महाराजांवर बोलणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली होती का? मी माफी मागितली असल्याचे त्यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here