पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो; भुजबळांच शरद पवारांबाबत वक्तव्य

0
2

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत रविवारी प्रसिद्ध दिली. त्या मुलाखतीत २००४ मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्ष फुटला असता, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून आपणास तसे सांगण्यात आले होते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, १९९१ साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. १९९५ मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगण्यात आले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असे भुजबळ यांनी शरद पवार यांच्या त्या मुलाखतीवर बोलताना सांगितले.

२००४ मध्ये आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची तयार होती. आम्ही तयार होतो पण पवार साहेब बोलत नव्हते, ते नाव घेत नव्हते. त्यांना काय अडचण होती माहीत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनाचा होतो. त्यासाठी त्यांची गटनेतेपदी निवड केली होती. परंतु आधी भाजपने नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आपणास हे माहीत नाही. सर्व चर्चेत उच्चस्तरीय नेते सहभागी होतात, असे भुजबळ म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here