
लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लग्नानंतर व्यक्तीचे आयुष्य बदलते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नवीन आयुष्याची सुरुवात करतात. हल्ली लग्नसाठी मुलगा शोधताना मुलीच्या कुटुंबातील लोकांच्या खूप अपेक्षा असतात. मुलीचा होणारा नवरा कसा आहे, किती कमावतो, त्याच्याकडे किती शेती आहे. सर्व गोष्टी नीट बघितल्या जातात. अशात शेतकरी मुलांना मुली भेटत नाही, असा नाराजीचा स्वर सोशल मीडियावर दिसून येतो. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्पष्टपणे सांगते की लग्न करणार तर फक्त शेतकऱ्याबरोबर करणार. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक अँकर एका तरुणीला प्रश्न विचारताना दिसत आहे.
अँकर – कोणाशी लग्न करणार
तरुणी – मी शेतकऱ्याशी लग्न करणार
अँकर – लग्नासाठी प्राधान्य तू कोणत्या मुलाला देशील?
तरुणी – मला वैयक्तिक रित्या शेतकरी मुलं खूप आवडतात. नक्की कोणालाही विचारू शकता. मी घरी सुद्धा म्हणते मी लग्न करणार तर मी शेतकऱ्याशी करणार. मला निसर्ग खूप आवडतो आणि सर नोकरी जरी केली तरी तिथेपर्यंत मर्यादेत आहे पण पोटाला खायला अन्न लागतं, ते सर्व आपल्याला शेतातून मिळतं आणि जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यालाच ओळखलं जातं.
अँकर – आजकालच्या पालकांची जी पसंती आहे, खासकरून मुलींचे जे वडील असतात, त्यांची पसंती तर शेतकरी मुलाला नाहीये. काय म्हणशील?
तरुणी – मला वाटतं की स्वत:चा मुलगा आधी काय करतो, हे बघावं. नंतर मुलीसाठी मुलाची निवड करावी.
अँकर – म्हणजे काय म्हणते तू, स्वत:चा मुलगा
तरुणी – स्वत:चा मुलगा फक्त ५-१० हजार रुपयावर कुठतरी कामाला आहे. मोबाईल शॉप म्हणा, वॉशिंग सेंटर इथं तिथं आहे आणि तुम्ही स्वत:च्या मुलीसाठी कुठंतरी कलेक्टर, इंजिनिअर बघता, हे चुकीचं आहे ना
या तरुणीचं मत ऐकून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बरोबर आहे ताई. हे आताच्या आई वडील आणि मुलींना कळायला पाहिजे..” तर एका युजरने लिहिलेय, “शेतकरी मुलगा खुप चांगला असतो… फक्त मुलींनी त्याच्याशी लग्न केले पाहिजे…पण आजच्या पिढीला आवडतो पण फक्त व्हिडीओ पुरते” आणखी एका युजरने लिहिलेय, “रॉयल शेतकरी. आले दिवस बरं का शेतकऱ्याचे.. लावा ताकद”
View this post on Instagram