बांगलादेशात आंदोलकांनी जाळल्या देवतांच्या मूर्ती, हिंदूच्या घरांची तोडफोड

0
400

बांगलादेशात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू असतानाच, आता अल्पसंख्याक हिंदूंना निशाणा बनवण्यास सुरुवात झाली आहे. जमाव निवडकपणे हिंदूंना लक्ष्य करत असून त्यांची घरे पेटवली जात आहेत. दुकाने लुटली जात आहेत. दरम्यान, बांगलादेशच्या मेहेरपूर इस्कॉन मंदिराची छायाचित्रे समोर आली आहेत. दंगलखोरांनी या मंदिराची तोडफोड करून मूर्ती जाळल्या आहेत. इस्कॉन मंदिरावरील हल्ला हा हिंसाचाराच्या व्यापक लाटेचा भाग आहे. गेल्या 24 तासांत बांगलादेशातील अनेक हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे.

इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंदा दास यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी या देवतांसह इतर मूर्ती जाळण्यात आल्या आहेत. या मंदिरात तीन भाविक राहत होते. ते या हिंसाचारातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तथापी, हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या नेत्या काजोल देबनाथ यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सोमवारी किमान चार हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. यात मंदिराचे नुकसान झाले आहे.
बांगलादेशात हिंदूंच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य –

बांगलादेशी मीडिया डेली स्टारच्या वृत्तानुसार, 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या आहेत. अनेक हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. अहवालानुसार, लालमोनिरहाट सदर उपजिल्हामध्ये धार्मिक हिंदू कार्यक्रमांशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घराची तोडफोड करून लुटमार करण्यात आली आहे.

दंगलखोरांनी पालिका सदस्य मुहीन रॉय यांच्या संगणक दुकानाची तोडफोड करून लुटमार केली. कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावात चार हिंदू कुटुंबांच्या घरांची तोडफोड आणि लूटमार करण्यात आली आहे. हातीबंधा उपजिल्ह्यातील पुर्बो सरदुबी गावात 12 हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत.

 

अहवालानुसार, हिंदूंना घरातून हाकलून मारले जात आहे. त्यांची दुकाने लुटली जात आहेत. या हल्ल्यांमुळे हिंदू समूदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनाजपूर शहर आणि इतर उपजिल्ह्यांमध्ये 10 हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ –