“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा

0
425

Monkey Viral video: माकड हा प्राणी प्रेक्षणीय स्थळांवर सर्रास दिसतो. कारण पर्यटकांकडे खाण्याचे पदार्थ असतात. अन् हे पदार्थ मिळवण्यासाठी माकडं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण माकडांच्या फार जवळ जाऊ नका, त्यांना खायला देऊ नका असा सुचना वारंवार दिल्या जातात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे.

 

पावसाने सर्वच भागात चांगलेच थैमान घातलेले आहे. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. मनाला आनंद देणारा पाऊस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो. मात्र हाच पावसाळा प्राण्यांसाठी तितकासा दिलासादायक नसतो. अशाच एका माकडाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपली माणुसकी दाखवत माकडाची मदत करू पाहते मात्र ही मदत पुढे एक भीषण रूप घेते, जे पाहून सर्वच डोक्याला हात लावतात.

 

झालं असं की, एक तरुणी पावासापासून वाचण्यासाठी माकडाला छत्री देते मात्र पुढच्याच क्षणी त्या छत्रीसकट ते माकड हवेत उडायला लागतं. कड्यावर बसलेलं माकड हवेमुळे थेट वर उडायला लागतं आणि दरीत खाली जाताना दिसतं आहे. एखाद्या पॅराशूटप्रमाणे माकड ही छत्री हातात घेऊन अवकाशात झेप घेतो आणि मुलगी दुरूनच हे दृश्य पाहून आपल्या निर्णयावर खंत व्यक्त करू लागते.हा व्हिडीओ पाहून मुलीवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. चांगलं करायला गेली आणि नको तेच घडलंय.

 

यावर नेटकरीही वेवगेवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “कर्म करायला गेली पण पाप झालं…” तर आणखी एकानं, बिचार मुलगी अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यापूर्वीही माकडाच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. माकडे कधी काय करतील काही सांगता येत नाही. कधी ते खाऊ चोरून नेतात, कधी वस्तू चोरतात, कधी हल्ला करतात, असे त्यांचे निरनिराळे रुप आणि व्हिडीओ समोर येत राहतात.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here