महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असून अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने सोमवारी पहिल्यांदा मतदान केले. मीडियाशी संवाद साधताना अक्षय कुमारने ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. भारताने मतदान केले पाहिजे. मला वाटतं मतदानाचा टक्का चांगला असेल.’
अक्षय कुमारला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. याआधी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. सोशल मीडियावर नागरिकत्व प्रमाणपत्र शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले होते की, हृदय आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्थानी आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.
पहा व्हिडीओ :
x.com/ANI/status/1792375951126585360